Bhiwandi Fake Police: भिवंडी : पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक
Bhiwandi Fake Police Arrested: पोलिस असल्याची बतावणी करत दोन भामट्यांनी एका व्यक्तीच्या अंगावर असलेल्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार, भिवंडी जवळील कोनगाव परिसरात घडला आहे.
भिवंडी :- पोलीस असल्याची बतावणी Fake Police करून एका व्यक्तीला हातचलाकी ने सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार भिवंडीच्या कोनगाव पोलीस ठाण्यात Bhiwandi Kongaon Police Station देण्यात आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास गावाचे कमानी समोर येथे फिर्यादी विकास वामन पाटील (53 वर्ष) या बांधकाम व्यवसायिकाला पोलीस असल्याचे बतावणी करून दोन व्यक्तींनी लाखोचा गंडा घातला आहे. Bhiwandi Latest Crime News
व्यवसायिकाला दोन भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लूटले
विकास पाटील हे पिंपळास गावाच्या कमानीजवळ असताना पाठीमागून मोटरसायकली वरून दोन अनोळखी व्यक्ती आले आम्ही पोलीस असल्याचे सांगून पुढे मोठ्या प्रमाणावर चोरी होतात त्यामुळे अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगितले. बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील चार लाख किमतीच्या दोन सोन्याचे चैन हातचलाखीने काढून घेतल्या त्यांची फसवणूक करून त्यांनी तिथून पळ काढला. घडलेल्या प्रकरणाचे तक्रार कोनगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी नोंद केली. पोलिसांना मिळालेला तक्रारीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 204,318 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सकपाळ हे करत आहे. Bhiwandi Latest Crime News