Bhiwandi Drug News : शांतीनगर पोलिसांची कारवाई ; दहा किलो 500 ग्रॅम गांजा जप्त
•पोलिसांकडून दोन आरोपींना अटक, आरोपीकडून तब्बल 11 मोबाईल फोन जप्त
भिवंडी :- राज्यात अंमली पदार्थ तस्करी खरेदी-विक्री या सर्वांवर पोलीसांची करडी नजर असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंमली पदार्थाचे तस्करी खरेदी विक्री करणाऱ्या विरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यात मागील हप्त्यात जवळपास 4 हजार कोटी रुपयांचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त करून उध्वस्त केला आहे. ही घटना ताजी असतानाच भिवंडीच्या शांतीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल दहा किलो पाचशे ग्रॅम गांजा पकडला असून, दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 11 मोबाईल फोन जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Bhiwandi Drug News
(29 फेब्रुवारी) मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक घुगे पोलीस हवालदार पवार यांच्या शांतीनगर पथकाने पाईपलाईन रोड पोगाव चौकी जवळ दोन आरोपींना अटक केली. आरोपींच्या रिक्षाची झडती घेतली असता एकूण दहा किलो पाचशे ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी गांजा सह आरोपींच्या जवळील 11 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख 40 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पहिल्या आरोपीचे नाव गुलाब हुसेन इस्त्राईलमियाॅं सलमान (22 वर्ष) आणि आरोपी सादिक अली बहादुर खान (27 वर्ष) दोन आरोपींना अटक केली असून शांतीनगर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात या प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपींविरूध्द एन.डी.पी. एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, दोनही आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि सुरेश घुगे हे करीत आहेत. Bhiwandi Drug News