•Drugs are Seized By Police In Bhiwandi मुजफ्फर मोबीन शेख (24 वर्ष) आणि समीर फिरोज रोकडीया (24 वर्ष) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 52 किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे
भिवंडी :- भिवंडी येथील भादवड नाका भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली. मुजफ्फर मोबीन शेख (24 वर्ष रा. सुभाष रोड नाशिक ) आणि समीर फिरोज रोकडीया (24 वर्ष रा. वडाळा गाव नाशिक) अशी अटकेत असलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून 52 किलो ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत 26 लाख 30 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
भादवड नाका येथील पाईपलाईन जवळ दोन जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चोपडे आणि पोलीस हवालदार सय्यद त्यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने सापळा रचला. त्यावेळी दोघेजण एका कारमधून येत होते.पोलिसांनी ही कार अडविली. त्या कारमध्ये 52 किलो ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कारमधील मुजफ्फर आणि समीर या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली. यांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क),20 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे हे करत आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…