क्राईम न्यूज

Bhiwandi Crime News : भिवंडीच्या कोनगाव परिसरात 9.50 लाखांची चोरी, घरातील दागिने व रोख रक्कम लंपास

Bhiwandi Crime News : भरदिवसा 9 लाख 50 हजार रुपयांची चोरी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमेवर चोरट्यांचा डल्ला

कल्याण :- कोनगाव (ता. भिवंडी) येथील एका 40 वर्षीय महिलेच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. विशेषतः ही चोरी भरदिवसा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.राहत्या घराचे दरवाजे कुलूप तोडुन 9 लाख 50 हजार किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली.कोणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी हि चोरी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 ऑगस्टच्या भरदुपारी कोनगाव परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेच्या घरी चोरी झाल्याची घटना कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून महिलेच्या घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून कपाटात ठेवलेले लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याचे सांगितले आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फिर्याद दाखल करत आज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts