मुंबई

Bhiwandi Crime News : ज्वेलर्समध्ये चोरी, बुरखा घालून दोन महिलेने ज्वेलर्स लुटले

•Bhiwandi Crime News भिवंडीतील किरण ज्वेलर्स मध्ये आठ लाखाचे दागिने लंपास, दोन महिने बुरखा घालून ज्वेलर्स लुटले

भिवंडी :- ब्राह्मणआळी येथे असलेल्या किरण ज्वेलर्स या दुकानांमध्ये दोन महिलेंनी बुरखा घालून ज्वेलर्स लुटल्याची घटना समोर आली आहे. दुकानातील कर्मचारी भगवानराम याची दिशाभूल करून दाखवण्यासाठी काढलेले सोन्याचे दागिने कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून लंपास केले आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीवरून जवळपास आठ लाखाचे दागिने या दोन बुरखाधारक महिलेने लुटलेले आहे.

मुंब्राच्या अमृत नगर येथे राहणाऱ्या मंछालाल जसाजी चौहान यांच्या मालकीचे भिवंडीच्या ब्राह्मण आळी येथे किरण ज्वेलर्स हे दुकान आहे. या ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये दोन महिला बुरखा घालून सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने आले होते. त्या दोन्ही महिलेने दुकानातील कर्मचारी (सेल्समन) भगवान राम यांची दिशाभूल करून ट्रेमध्ये दाखवण्यासाठी काढलेले दागिने ज्याची किंमत आठ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लबाडीने चोरी करून तिथून नेले आहेत. याप्रकरणी चौहान यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात दोन महिला आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकर हे करत आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts