Bhiwandi Crime News : भिवंडीत तडीपार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
Bhiwandi Crime News : मनाई आदेश भंग करणाऱ्या तडीपार आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद..
भिवंडी :- भिवंडी एक असंवेदनशील शहर म्हणून याची ओळख आहे. शहरामध्ये कायदा सुव्यवस्थाचा अबाधित राखण्याकरिता कोणत्याही प्रकारे गुन्हा घडू नये याकरिता सातत्याने पोलीस कर्तव्यनिष्ठ असतात. अशाच एका तडीपार Tadipar Criminal आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले Bhwandi Police Arrested Criminal आहे. आरोपीला शहरांमध्ये मनाई आदेश असताना ही मनाई आदेश भंग करून शहरात वावरत होता. अशा आरोपीला भिवंडी शहर पोलिसांनी Bhiwandi Police अटक केली आहे. पोलीस आयुक्त ठाणे शहर,आशुतोष डुंबरे Thane CP Ashutosh Dumbare यांनी आपल्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यापासून आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांना निर्देश दिले आहे की मनाई आदेश भंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध कडक कारवाई करावे असे निर्देश दिले आहे. Bhiwandi Crime News
भिवंडी गुन्हे शाखा कक्ष-2 पोलिसांनी तडीपार आरोपीला केले अटक
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 भिवंडी यांनी आरोपी मन्सुर अस्लम खान (24 वर्ष) याला सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था आबाजीत रखण्याकरिता 13 फेब्रुवारी 2024 रोजी दोन वर्षाच्या कालावधी करिता मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे ,रायगड व पालघर या जिल्ह्यातून हद्दपार केले होते. परंतु आरोपी मन्सूर अस्लम खान यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि भिवंडी परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त यांची कोणतीही परवानगी न घेता शहरांमध्ये प्रवेश केला होता. भिवंडी शहर पोलीस ठाण्याला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा 26 जून 2024 रोजी दुपारी 4.30 सुमारास मंगल बाजार स्लॅब, भिवंडी येथे आलाय अशी माहिती पोलिसांना मिळाली भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन ने सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मन्सूर खान याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राणे हे करत आहे. Bhiwandi Crime News