Bhiwandi Crime News : अनोळखी तरुणाचा खून झाल्याचं उघड, पोलिसांनी सात आरोपींना केली अटक
•मोबाईलच्या चोरीच्या कारणावरून बेदम मारहाण, मारहाणीत तरुणाचा मृत्यू
भिवंडी :- शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. शांतीनगर पोलिसांनी मृतक आणि आरोपी यांची ओळख पटवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात गुन्ह्याचा उघड केल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईल चोरीच्या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण केली या मारहाणीत तरुणाच्या जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 ऑक्टोंबर च्या दरम्यान शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम 103 प्रमाणे दाखल असलेल्या पुण्यातील मृत्यू व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव मोहम्मद रहमद शहा आलम (20 वय) असे आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद हा कलकत्ता येथे राहणारा असून तो सहा महिन्यांपूर्वी भिवंडी येथे कामासाठी आला होता. मोबाईल चोरीच्या कारणावरून सहयोग नगर येथे राहणारे अरमान व त्याच्या चार-पाच मित्र यांनी मोहम्मद याला बेदम मारहाण केली या मारहाणीत मोहम्मद याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याला गोविंद नगर येथील राहुल हॉटेलच्या मागे पाईप लाईन रोड भिवंडी येथे लाकडी लाडक्याने व हत्यामुख्याने महाराज केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी अरमान यांच्यासह त्याच्या इतर साथीदारांना म्हणजेच एकूण सात आरोपींना अटक केली आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कस्टडीत असून इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करून उत्तर प्रदेश बिहार येथे रवाना केले आहेत.