Bhiwandi Crime News : भिवंडी कंपनीमध्ये चोरी स्ट्रिप्स आणि स्क्रॅप जवळपास तीन लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल लंपास केला
Bhiwandi Crime News : कोनगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद कंपनीमध्ये लाखो रुपयांचे स्क्रॅप चोरीला
भिवंडी :- शहरात मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग, गोडाऊन स छोट्या-मोठ्या कंपन्या आहे. या कंपन्यातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होतो असे असतानाही येथे चोरीच्या घटनाही सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. भिवंडीच्या कोनगाव Bhiwandi Kongaon Robbery परिसरात अज्ञात चोरट्याने भूमी वर्ल्ड येथे असलेल्या एका कंपनीमध्ये चोरट्याने कंपनीतील स्ट्रिप्स आणि स्क्रॅप लंपास केले आहे. जवळपास तीन लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. Bhiwandi Crime News
फिर्यादी पराग गोपाळ गायकवाड (32 वर्ष) यांच्या भिवंडी हे काम करीत असलेल्या भूमी वर्ल्ड येथे सोवर रेनीवेबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पिंपळकर भिवंडी या कंपनीच्या खिडकीचे ग्रील कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून त्या वाटे आतमध्ये प्रवेश केला आणि कंपनीतील निकेल स्ट्रिप्स व स्क्रॅप असा एकूण तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरी करून चोरटे लंपास झाले. या घटनेनंतर गायकवाड यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलिसांनी फिर्यादी नोंद करत अज्ञात आरोपींच्या विरोधात भादवी कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रायते हे करत आहे. Bhiwandi Crime News
Web Title : Bhiwandi Crime News : Stolen strips and scraps worth about three lakhs and sixty thousand were looted in Bhiwandi company.