Navi Mumbai Cyber Crime : देशभरात सायबर फसवणुकीचा थैमान! बनावट ‘इनकम टॅक्स अधिकारी’ बनून डिजिटल अरेस्टची धमकी देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीवर नवी मुंबई पोलिसांचा भक्कम घेरा

Navi Mumbai Latest Cyber Crime : एनसीआरपीसी पोर्टलवर 73 तक्रारी; बोगस बँक खात्यांचा वापर करून 1.81 कोटींच्या फसवणुकीचा पर्दाफाश
नवी मुंबई – “डिजिटल अरेस्ट”ची भीती दाखवून महिलांना फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीवर नवी मुंबई पोलिसांनी Navi Mumbai Cyber Crime Group मोठा झटका दिला आहे. या टोळीने बनावट ‘इनकम टॅक्स अधिकारी’, सीबीआय, ईडी व सुप्रीम कोर्ट यांच्या लेटरहेडचा वापर करून महिलांना व्हॉट्सॲपवर टॅक्स चोरीचा आरोप मांडला आणि तब्बल 1.81 कोटी रुपयांची फसवणूक केली. Navi Mumbai Latest Cyber Crime News
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या सूचनेवरून, सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे व पोलीस उप आयुक्त अमित काळे यांच्या सहकार्याने सायबर फसवणुकीचा समांतर तपास सुरू झाला.
एनसीआरपीसीच्या ऑनलाईन पोर्टलवर देशभरातून 73 तक्रारी या टोळीविरोधात नोंद झाल्या आहेत. आरोपींनी देशभरात बोगस बँक खाते उघडून, गाळा भाडेतत्वावर बोगस कंपन्या स्थापन करून इंटरनेट बँकिंगचा गैरवापर केला.
बनावट सीबीआय-ईडी- सुप्रीम कोर्ट लेटरहेड, डिजिटल धमक्या आणि गाळा भाडेतत्वावर बोगस कंपनींचा वापर; सायबर पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकारी शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली तपासाची गती वाढवली
सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी तीन पथक तयार करून तीन आरोपींना अटक केली आहे:
1) रमेश बाबुलाल शेट (पटवा), (45 वय अंधेरी वेस्ट)
2) अमिश दिपक तुलशीदास शाह, (42 वय काळबादेवी रोड)
3) राजकुमार गेलाराम नारंग, अहमदाबाद (पोलीस कोठडीत) (55 वय)
या टोळीने बनावट डिजिटल कॉल्सद्वारे भीती दाखवून, महिलांपासून गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये वसूल केले. सायबर पोलिस आता देशभरातील या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत आणि या सायबर नेटवर्कचा पूर्ण फोडफाड करण्यासाठी कारवाईला वेग देत आहेत.गुन्ह्यात एकूण 11.35 रुपये रोख रक्कमही आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून खालील मालमत्ता जप्त केली आहे:
01 लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप
18 विविध कंपनींचे मोबाईल फोन
18 विविध बँकांचे चेकबुक
33 विविध बँकांचे चेक्स
02 विविध बँकांचे पासबुक
32 विविध बँकांचे डेबिट कार्ड्स
27 व्होडाफोन कंपनीचे सिमकार्ड
10 बोगस कंपन्यांचे 8 रबरी शिक्के/स्टॅम्प
10 बोगस कंपन्यांच्या 36 बँक अकाउंट उघडण्याची कागदपत्रे


