मुंबईक्राईम न्यूज

Bhiwandi News : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते भिवंडी भरोसा कक्षाचे उद्घाटन

•भिवंडीत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी भरोसा कक्षाचे पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

भिवंडी :- सोमवारी (1 जूलै) भिवंडी पोलिस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या भरोसा कक्षाच्या उद्घाटन पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. भिवंडीत महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी भरोसा कक्ष सुरू करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील, भिवंडी पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांसह सर्व पोलिस अधिकारी, महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस प्रशासनाने 2009 मध्ये महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केले होते. 2019 मध्ये त्याचे नाव भरोसा कक्ष असे केले आहे. त्यामाध्यमातून कुटुंबीयांना भरोसा व विश्वास देण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहे असे प्रतिपादन पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले आहे.

भिवंडी शहरातील महिलांना ठाणे येथे येण्याचा त्रास टाळावा यासाठी भिवंडीत हे कक्ष सुरू करण्यात येत आहे. घटस्फोटाची कारणे काळानुरूप बदलत गेली. शुल्लक कारणावरून घटस्फोट घेतले जातात. त्यामध्ये महिला देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. पण यामध्ये प्रश्न त्या दोघांचा नसतो तर अनेकांवर त्याचा परिणाम होत असतो. त्यांचे समुपदेशन, मार्गदर्शन करून कुटुंब जोडण्याचे काम होणार आहे असे सांगत ठाणे पोलिस आयुक्तालयात मागील दीड वर्षात 910 तक्रार भरोसा कक्षात दाखल झाल्या त्यापैकी 400 तक्रारींमध्ये तडजोड करून कुटुंब जोडण्यात यश मिळाले आहे असे प्रतिपादन शेवटी आशुतोष डुंबरे यांनी केले.

पोलिसांनी कायदा राबविताना सामाजिक भान राखून कौटुंबिक वाद सोडवताना मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. संयुक्त कुटुंब संपुष्टात येत असताना छोट्या कुटुंबात शुल्लक कारणातून कौटुंबिक वाद वाढत असतात त्यामध्ये समाजाचे समाधान करण्याचे काम नक्कीच होईल अशी ग्वाही अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांनी दिली. भरोसा कक्ष हा सुरवाती पासून ठाणे पोलिस आयुक्तालयात गुन्हे विभागाच्या अंतर्गत सुरू होता. कौटुंबिक वाद गुन्हे दाखल करण्या पूर्वी भरोसा कक्षात समुपदेशन मार्गदर्शन करून सामोपचाराने सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

भिवंडी परिसरातील महिलांना ठाणे येथे येणे वेळकाढू व खर्चिक असल्याने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी भिवंडी येथे भरोसा कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे असे प्रास्तावीक गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले. भिवंडी पूर्व विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन पोलिस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी करताना एक जुलै पासून जुने कायदे संहिता रद्द करून नव्याने अंमलात आलेल्या भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष संहिता याची माहिती उपस्थितांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0