Bhiwandi Crime News : निजामपुरा पोलिसांची कामगिरी ; दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना केले अटक

•निजामपुरा पोलिसांनी दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या एका टोळीला अटक केली असून, त्यांच्याकडून प्राणघातक हत्यार आणि वस्तू पोलिसांनी केल्या जप्त
भिवंडी :- देशात राज्यात रमजानचा महिना चालू असून मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव यांच्या रमजान हा पवित्र महिना साजरा केला जात आहे. भिवंडीच्या मुस्लिम वस्ती असलेल्या भागात एक टोळी दरोडाच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवाळल्या आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून प्राणघातक हत्यारे आणि काही वस्तू जप्त केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे दरोडा पूर्वीच आरोपींना अटक केली असून त्यातील अद्यापही दोन आरोपी फरार आहे पोलिसांकडून त्या दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात आहे. Bhiwandi Crime News
निजामपुरा पोलीस ठाणे चे पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून, पोलीस उपनिरीक्षक गिते, पोलीस शिपाई शेख व त्यांचे पथकाने (9 एप्रिल रोजी) पहाटे 05.25 वा. चे सुमारास तळवळी नाका ते कांबा रोड, तळयाच्या शेजारी, भिवंडी येथे सापळा रचुन तेथे आरोपी.1)नईम जमाल अहमद सयद, (19 वर्षे), रा.नागाव रोड, भिवंडी 2) सुफियान भद्रेआलम अन्सारी,(19 वर्षे), रा.नागाव रोड, भिवंडी 3) सोहेल सनाउल्ला शेख, (26 वर्षे), रा.चव्हाण कॉलनी, भिवंडी यांना शिताफीने ताब्यात घेतले असता, त्यादरम्यान त्यांचे इतर दोन साथीदार फरार झाले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, ते सदर परिसरात दरोडा टाकण्याचे तयारीत असल्याचे समजले. आरोपींकडुन ऑटो रिक्षा, एक स्टील बॉडी असेलेले देशी बनावटीचे रिव्हॉल्वर, एक जिवंत राउंड, मिरचीपुड, एक देशी बनावटीची स्टीलची एअर गन, एक लोखंडी फायटर, एक चाकु, नायलॉनची रस्सी, एक लोखंडी रॉड, तीन मोबाईल फोन असे प्राणघातक हत्यारे व साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकारा़बाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुध्द गुन्हा भा.द.वि.कलम 399,402 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपी क्र.1 ते 3 अटक यांना करण्यात आली आहे. व इतर दोन फरारी आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमित गिते हे करीत आहेत. Bhiwandi Crime News