Bhiwandi Crime News : भिवंडी तरुणाकडे देशी बनावटीचे दोन पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे,दोन मॅगझिन
Bhiwandi Crime News Narpoli Police Arrested Man With Gun And Magazine : नारपोली पोलिसांची मोठी कारवाई ; तरुणाकडील दोन बंदूक जप्त नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
भिवंडी :- देशासह राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचे Lok Sabha Election वारे वाहू लागले आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक होणार असून काही दिवसांत पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. पोलिसांनी सर्व शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी कंबर कसली आहे. बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Thane CP Ashutosh Dumbare) यांनी बडगा उगारला असून बेकायदेशीर शस्त्राचे देवाण-घेवाण करणाऱ्यांविरुद्ध तसेच बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून मोठी कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारे भिवंडीच्या नारपोली पोलिसांनी एका तरुणाला बेकायदेशीर रित्या बंदूक बाळगल्या प्रकरणे अटक केले आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील दोन बंदुके जप्त केले आहे. Bhiwandi Crime News
नारपोली पोलीस ठाणेचे पोलीसांना मिळालेल्या माहिती वरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शेलार, पोलीस शिपाई नाईक व त्यांचे पथकाने,(10 एप्रिल रोजी) 01.40 वा.चे सुमारास, मुंबई हायवेवरील मानकोली ब्रिज सुरू होणेपूर्वी, मानकोली, भिवंडी येथे आरोपी कमलेश फुलचंद गौतम, (25 वर्षे) (रा.शिवगंज, उत्तरप्रदेश राज्य) यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे ताब्यात 2 देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र), 2 जिवंत काडतुस, दोन मॅगझिन, सॅमसग कंपनीचा मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळुन आला. प्रकाराबाबत सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार हे करीत आहेत.