क्राईम न्यूज

Bhiwandi Crime News : भिवंडीत मोक्का आणि जबरी चोरी,18 गुन्ह्यातील सराईत चोराला अटक

Bhiwandi Crime Branch Arrested Criminal : गुन्हे शाखा कक्ष-2, भिवंडी यांनी कारवाई करत आरोपीला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे

भिवंडी :- जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, सायकल चोरी यांसारख्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला भिवंडी पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-2 यांनी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या Shantinagar Police Station हद्दीतून अटक केली आहे. आरोपीवर मोक्का कायदाअंतर्गत गुन्हे दाखल असून एकूण 18 गुन्हे आरोपीवर दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.ऑन अली सरर्फराज जाफरी उर्फ शेट्टी, (वय 24, रा. पिराणीपाडा, भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय न्याय संहिता कलम 303(2) या गुन्ह्याचा गुन्हे शाखा घटक-2 भिवंडी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार हे तपास करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी हा शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरी केलेली आहे. बैलका मैदान, चव्हाण कॉलनीच्या मागे, भिवंडी येथे ताडी पिण्यासाठी आलेला आहे अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी ऑन अली सरर्फराज जाफरी उर्फ शेट्टी, ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पोलिसांनी चार चैन स्नॅचिंग आणि ते मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली आरोपीने दिली आहे. तसेच आरोपीकडून दोन लाख 65 हजार किमतीचा मुद्देमाल ही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपीच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यातही चैन स्नॅचिंग चोरीचे गुन्हे दाखल आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधातील तब्बल 18 गुन्हे उकल केल्या असून या प्रकरणी आरोपीला मोक्का कायदा अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व शेखर बागडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध-1, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक-2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, किशोर थोरात, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, नितीन बैसाने यांनी केलेली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago