Bhiwandi Crime News : बेकायदेशीररित्या पिस्टल (बंदूक) बाळगणारा रिक्षाचालक अटकेत
•भिवंडी शहर पोलिसांची कारवाई बंदुकीसह रिक्षा चालकाला अटक, पोलिसांची आरोपीकडून चौकशी घातपातची शक्यता
भिवंडी :- भिवंडी शहरातील कामतघर येथून एका रिक्षा चालकाला पोलिसांनी बेकायदेशीर रित्या बंदूक बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. रिक्षाचालक याच्याकडे एक बंदूक पोलिसांना आढळले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रिक्षाचालक यांच्याकडून घातपात करण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
भिवंडी शहरातील कामतघर येथे एक रिक्षा चालक ज्याच्याकडे बंदूक असल्याची माहिती भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस शिपाई शरद लक्ष्मण गोसावी यांच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून रिक्षा चालकाला ताब्यात घेतले, रिक्षा चालकाचे अंगझडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे एक पिस्टल (बंदूक) सापडले. बेकायदेशीर रित्या बंदूक बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपक श्रीराम तायडे (32 वर्ष) याला अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडील बंदूक पोलिसांनी जप्त केले आहे. पोलिसांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अटक आरोपी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील हे चौकशी करत असून रिक्षा चालक याच्याकडून कुठे घातपात केला आहे? कुठे करणार होता का? याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.