•बेकायदेशीर रित्या तंबाखूजन्य पदार्थाचे वाहन करणाऱ्या आरोपीला अटक, ७० लाखाहून अधिक किमतीचे तंबाखूजन्य पदार्थ जपतो
भिवंडीत :- महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना तरी शहरातील अनेक ठिकाणी बेकायदेशीर रित्या सर्रास तंबाखूजन्य पदार्थाचे वाहतूक करणार याची घटना दिवसां दिवस समोर येत आहे. सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. पोलिसांकडून अमली पदार्थ दारू पैसे आणि तंबाखूजन्य पदार्थ यांसारख्यांवर खरडी नजर असून याच्या विरोधात पोलिसांनी बडगा उभारला आहे. अन्नसुरक्षा तंबाखू प्रतिबंध विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. Bhiwandi Crime News
04 एप्रिल रोजी दुपारी 4.35 चे सुमारास, नारपोली पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, पोलीस हवालदार पाटील व त्यांचे पथकास मिळालेल्या माहितीवरून, दापोडा रोड, भिवंडी येथे छापा टाकला असता, सदर ठिकाणी आरोपी अजयकुमार श्यामपाल सिंग, (28 वर्षे) याने टाटा कंपनीचा कंटेनर वाहनातुन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पदार्थ सनकी एस.एन.के.गुटका, रॉयल 1000, विवो कंपनीचा मोबाईल असा एकुण 70 लाख 30 हजार 600 रूपये किमंतीचा माल विक्रीकरिता बेकायदेशीररित्या वाहतुक करीत असताना मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि. कलम 328,188,272,273,269 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 23,26(2)(iv),27,30(2)(अे) सह शिक्षा कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अजयकुमार श्यामपाल सिंग, (28 वर्षे) यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहे. Bhiwandi Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…