Bhiwandi Crime News : भिवंडीत लाखोचा गुटखा जप्त..!!
•Bhiwandi Crime News निजामपुरा पोलिसांच्या अन्नसुरक्षा आणि मानके विभागाची कारवाई ; शानदार मार्केटवर छापा लाखो रुपयांचा गुटखा जप्त,
भिवंडी :- राज्यात गुटखाबंदी असताना सर्रास शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थ गुटखा विक्री केली जाते. भिवंडीत बेकायदेशीर होते गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत छापा टाकला या छापे मध्ये लाखोचा गुटखा पोलीसांकडून जप्त केला आहे. राज्य सरकारने गुटखा बंद करिता कायदा निर्माण केला असूनही बेकायदेशीर रित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना निजामपुरा पोलिसांची अटक केली आहे.
शानदार मार्केटमध्ये छापा, लाखोचा गुटखा जप्त
निजामपुरा पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक-01 सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस शिपाई सुरळकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार भिवंडीच्या शानदार मार्केटमध्ये बेकायदेशीररित्या गुटखाची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलीसांकडून सापळा रचून छापा टाकला असता पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेले तंबाखूजन्य पदार्थ केसरी युक्त विमल गुटखा पान मसाला, केतन गुटखा पान मसाला, एस ए के गुटखा पान मसाला, सिग्नेचर गुटखा, बाजीराव गुटखा, मस्तानी जर्दा आणि एक छोटा हत्ती टेम्पो असे एकूण 38 लाख 26 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बेकायदेशीर रित्या तंबाखूजन्य पदार्थ विक्री संदर्भात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांचे नाव मोहम्मद अस्लम अन्वर मन्सुरी (30 वर्ष), अब्दुल्ला इसाउद्दीन खान (45 वर्ष) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून या आरोपींच्या विरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 123,127,275,3(5) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26 (2),27,23,26(2) ( iv),30 (2), ऐ सह कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करत आहे.