क्राईम न्यूज

Bhiwandi Crime News : बस प्रवासात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला

Bhiwandi Crime News : बस प्रवासात 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेले

भिवंडी :- शेती व्यवसाय करणाऱ्या वृद्ध व्यक्तीचे बसमधून प्रवास करत असताना रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. सदानंद कोंडू मोकाशी (77 वर्ष रा. कोनसई, वाडा) हे बसने भिवंडी एस.टी स्टॅण्डवरून विरार येथे घरी जात असताना ही घटना घडल्याचे सांगितले आहे. निजामपूर पोलीस ठाण्यात Nijampur Police Station तक्रार दाखल करण्यात आली आहे. Bhiwandi Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदानंद मोकाशी हे 13 ऑगस्टच्या दरम्यान भिवंडी एसटी स्टॅण्डवरून आपल्या घरी विरार येथे बसने जात असताना तिकीट काढण्यासाठी वंजारपट्टीनाका येथे बॅग उघडली असता बागेतून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात. त्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सात लाख 90 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला केल्याची तक्रार निजामपुरा पोलीस ठाण्यात दिली आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत हे करत आहे. Bhiwandi Latest Crime News

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts