मुंबई

Bhiwandi Crime News : भिवंडीत मोबाईल चोरणारी टोळी गजाआड; 17 लाखांचे 113 फोन जप्त

पोलिसांच्या कामगिरीमुळे 10 गुन्हे उघड; CEIR पोर्टलची मोलाची मदत

भिवंडी :- मोबाईल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी भिवंडी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. एका मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच, CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने इतर 103 हरवलेले मोबाईलही शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. या एकूण 113 मोबाईलची किंमत सुमारे 17 लाख 75 हजार 500 रुपये आहे.

भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याचा तपास करत असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि पोलीस उपनिरीक्षक रविंद्र बी. पाटील यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सज्जाउद्दीन मोहंमद खैयाद उर्फ गुड्डू (36 वय) याला राजनोली बायपास येथून अटक केली.

आरोपीच्या पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या कसून चौकशीत त्याने 10 मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 10 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, ज्यांची किंमत सुमारे 1 लाख 13 हजार 500 रुपये आहे. त्याच्या अटकेमुळे भोईवाडा, शिळडायघर, निजामपुरा, कोनगाव आणि शांतीनगर पोलीस ठाण्यांतील एकूण 10 गुन्ह्यांची उकल झाली आहे.

या कारवाईमध्ये, गुन्हे शाखेच्या इतर पथकांनी CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करून 40, 47 आणि 16 असे एकूण 103 मोबाईल फोनही हस्तगत केले, ज्यांची किंमत 15 लाख 77 हजार 400 रुपये आहे. अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, पंजाबराव उगले, उपआयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी यशस्वी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0