Bhiwandi Crime News मोटार सायकल चोरी करणार्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक
Shanti Nagar Police Arrested Robbers : मोटार सायकल चोरी करणार्या चार आरोपींना शांतीनगर पोलिसांच्या कक्ष गुन्हे शाखा-2 यांनी अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 91 किंमतीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
भिवंडी :- मोटार सायकल चोरी Bike Robbers In Bhiwandi करणार्या चार आरोपींना भिंवडी मधील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या Shantinagar Police Station कक्ष गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 2.91 लाख किंमतीच्या मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
शांतीनगर पोलीस ठाण्यात Shanti Nagar Police Station भारतीय दंड संहिता कायदा कलम 379,201,411,34 या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या घटक-2 पोलीस तपास करत होते.भिवंडीचे अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असताना त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे संशयीत आरोपी मोहम्मद यासीन बाबू शेख उर्फ पठाण, (वय 38 वर्षे), तौसीफ मुख्तार शेख (वय 25), मल्लीक राफीद अब्दूल माजीद अंसारी (वय 24) , वाहिद अहमद मुसा शेख,(वय 35) सर्व राहणार, रा.मालेगाव, जि. नाशिक यांना संशयावरून ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशी केली असता आरोपींना गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. तसेच आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एकुण 6 मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असुन 11 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटर सायकली असा एकुण 2.91 लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध – 1) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक 2 भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उप निरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार थोरात, यादव, भोईर, जाधव, पोलीस शिपाई ठाकुर,सोनवणे, बैसाने यांनी केलेली आहे.