Bhiwandi Crime News : भिवंडीत कारमध्ये घबाड, 2 कोटीची रोकड जप्त!
सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे आणि भिवंडी पूर्व मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांची संयुक्त कारवाई, रोकड आयकर विभागाच्या ताब्यात !
भिवंडी :- राज्यातील सर्वच जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांच्या Vidhansabha Election पार्श्वभूमीवर भरारी पथकं नेमण्यात आली असून मुंबई, पुणे, नवी मुंबई,ठाणे, ग्रामीण महाराष्ट्रातही पोलिसांकडून नाकाबंदी व वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान,15 ते 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 187 कोटी 88 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली. भिवंडी शहरातील एका वाहनातून मोठी रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. शांतीनगर पोलिसांना कोट्यावधींचा घबाड कार मध्ये भेटले आहे. त्यामध्ये दोन कोटीहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी पोलीस ठाण्यात पाचारण करून पंचनामा केला आहे. तर शांतीनगर पोलिसांनी जप्त केलेली रोकड आयकर विभागाच्या ताब्यात दिली आहे.
भिवंडी Bhiwandi Crime News पुर्व विधानसभा मतदारसंघात सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे, शांतीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोलप पोलीस शिपाई चव्हाण, नाकाबंदी दरम्यान कारवाई करताना धामणकर नाका ते मानकोली कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका वाहनात तपासणी केली असता त्या वाहनांमध्ये रोख रक्कम असल्याचे गाडीचे चालक महेंद्र पांडे यांनी सांगितले. तसेच ती रोख रक्कम कशासाठी आणि कोणाकडे घेऊन जात आहे व त्या संदर्भात कोणतीही कागदपत्र न आढळल्याने सदर रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
गाडी सहाय्यक पोलीस कार्यालय, पूर्व विभाग, भिवंडी येथे आणण्यात आली त्यानंतर स्टॅटिक सर्विलन्स टीम -6, भिवंडी पूर्व-137 विधानसभा चे पथक, सहाय्यक खर्च निरीक्षक शरद यादव, एमसीसी नोडल ऑफिसर गुरख तसेच आयकर निरीक्षक पवन कौशिक यांना तात्काळ माहिती देऊन ठिकाणी पाचारण केले व सर्वांसमक्ष सदर गाडीचा पंचनामा केला असता गाडीमध्ये एकूण 2 कोटी 30 लाख 17 हजार 600 रूपये इतकी रोख रक्कम मिळुन आली. रक्कमे बाबत कोणतीही कागदपत्रे गाडी चालकाकडे नसल्यामुळे रक्कम जप्त करून ती पुढील कारवाईसाठी आयकर विभाग यांचे ताब्यात देण्यात आली असुन पुढील कारवाई चालू आहे.