Bhiwandi Latest Crime News : नारपोली, भिवंडी शहर, निजामपुरा आणि शांतीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस ; आरोपीला अटक; 5.98 लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडी :- भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यातील Narpoli Police Station घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्या अटकेमुळे घरफोडीच्या एकूण 9 गुन्ह्यांची उकल झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून तब्बल 5 लाख 98 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. Bhiwandi Latest Crime News
नारपोली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक-2 चे पोलीस करत होते. पोलीस उपनिरीक्षक जनार्दन सोनवणे, रवींद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. या तपासानंतर पोलिसांनी आकाश उर्फ चिन्या शशिकांत जाधव (वय 25, रा. मानपाडा, ठाणे) याला ताब्यात घेतले.
ही कामगिरी ठाण्याचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शोध-1) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखा घटक-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक राज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या अटकेमुळे भिवंडीतील घरफोडीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…