Bhiwandi Crime News : पोलीसांकडून धडाकेबाज कारवाई;भिवंडीतील कुख्यात गुन्हेगाराला दुसऱ्यांदा अटक
Bhiwandi Crime News : शांतीनगर पोलिसांची कारवाई ; तडीपार आरोपीला अटक, तीन महिन्याकरिता चार जिल्ह्यातून केले होते हद्दपार
भिवंडी :- राज्यात शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यातील मतदान 20 मे ला संपन्न झाले आहे. शहरात अद्यापही मतदानाचा निकाल लागोसतोपर्यंत म्हणजेच चार जून पर्यंत राज्यात आणि देशात आचारसंहिता लागू आहे. पोलीस Bhiwandi Police आताही कारवाई मोठ्या प्रमाणावर करत आहे अशातच भिवंडीत एका तडीपार आरोपीला पुन्हा एकदा अटक करण्यात आली आहे. आरोपी याचा तडीपार Bhiwandi Tadipar Criminal कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच शहरात मोकाट वावरत होता. भिवंडीच्या शांतीनगर पोलीस Bhiwandi Shanti Nagar Police पथकाने अटक केली आहे. Bhiwandi Crime News
शांतीनगर पोलीस ठाणे – मनाई आदेश भंग
आरोपी शमीउल्ला जमशेद अन्सारी, ( 25 वर्षे), (रा.आमपाडा, भिवंडी) यास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांनी ठाणे, बृहन्मुंबई, मुंबई उपनगर व पालघर जिल्हा या महसुल हद्दीतुन 3 महिने कालावधीकरिता हद्दपार करण्याचे आदेश, 23 मार्च 2024 अन्वये दिले होते. परंतू आरोपी याने त्यास सदर महसुली जिल्हयामध्ये आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-2, भिवंडी यांचे परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असताना सदर मनाई आदेशाचा भंग करून, 21 मे रोजी रात्री 9.10 वा. चे सुमारास, खंडुपाडा भिवंडी गुन्हे शाखा, घटक-2, भिवंडी चे पथकास मिळुन आला. सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपीविरूध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी शमीउल्ला जमशेद अन्सारी, (25 वर्षे) यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक मोहिते हे करीत आहेत. Bhiwandi Crime News