Bhiwandi Crime News : पूर्ववैमान्यातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, तीन आरोपींना अटक

•खुनाचा प्रयत्न ; किरकोळ वादातून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपींना अटक
भिवंडी :- किरकोळ कारणाने आणि पूर्व वैमनस्यातून मोठा वाद होऊन ठार मारण्याचा प्रयत्न भिवंडीत घडला आहे. तात्काळ पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी इरशाद अली नुर अली (27 वर्ष) यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केले आहे. फिर्यादी याच्या भावाला म्हणजेच नौशाद अली (27 वर्ष) याला नागोरे हॉटेल समोर मंगल बाजार भिवंडी येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे यासंदर्भातील तक्रार भिवंडी शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
तीन आरोपींना अटक प्राणघातक हल्ला..
8 जुलैच्या सायंकाळी 7.30 वाजल्याच्या सुमारास नौशाद याच्यावर रहमान निसार खान (25 वर्ष), अब्दुल खान (23 वर्ष), निसार खान (45 वर्ष) कोणत्यातरी कारणावरून एकत्रितपणे त्याच्यावर धारदार हत्याराने डोक्यावर आणि छातीवर बरगडीवर पाठीवर प्राण घातक हल्ला केला आहे. यामध्ये नौशाद गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. घडलेल्या प्रसंगाबाबत नौशाद याचा भाऊ इरशाद यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 109 (1),115 (2),352,3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सांगळे हे करत आहे.