Bhiwandi Crime News : भिवंडीत ठार मारण्याचा प्रयत्न, कंपनीच्या मालकाने कामाचे पैसे न दिल्याने चाकूने वार
•Bhiwandi Crime News भिवंडी कंपनीच्या मालकावर जीवघेणा हल्ला, चाकूने वार
भिवंडी :- कंपनीच्या मालकाने काम केल्याचे पैसे न मिळाल्याने कामगाराने मालकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात कंपनी मालक गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याचे उपचार चालू आहे. नारपोली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याचे पुढील चौकशी चालू आहे.
(10 एप्रिल) रोजी सायंकाळी 05.30 वा.चे सुमारास, महाराष्ट्र पी.व्ही.सी. कंपनी, अरिहंत कंपाउंड, पुर्णा गाव, भिवंडी येथे, फिर्यादी शिवम पप्पु रायकवार, (20 वर्षे) मजुरी,भिवंडी हे कंपनीत काम करीत असताना, तेथे पूर्वी काम करणारा आरोपी अमित सोमई प्रजापती,(23 वर्ष) भिवंडी हा आला व त्याने कंपनीचे मालक राकेश रामनरेश सिंग, (45 वर्षे) यांचेकडे पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मागितले. आणि त्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. त्या भांडणाचा आरोपी अमित प्रजापती याने राग मनात धरून राकेश सिंग यांचे छातीचेे डाव्या बाजूस चाकु खुपसुन गंभीर जखमी करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द भा.दं.वि. कलम 307, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष पवार हे करीत आहेत.