•लैंगिक अत्याचाराचा संशय; सोन्याचे दागिने जागेवरच असल्याने ‘चोरी’चा उद्देश फेटाळला
भिवंडी :- ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी परिसरात एका 65 वर्षीय महिलेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास करत रविंद्र गवते (वय 40) या आरोपीला अटक केली आहे.
मंगळवारी (28 ऑक्टोबर) सायंकाळी गणेशपुरी भागात वास्तव्यास असलेल्या या वृद्ध महिलेचा मृतदेह गावातील एका शेतात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
लैंगिक अत्याचाराचा संशय
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेले नव्हते. त्यामुळे हे प्रकरण चोरीच्या उद्देशाने घडले नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मृत महिलेचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी हत्येसोबतच लैंगिक अत्याचाराचे कलम देखील लावून गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या मृत्यूची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अटक आणि पुढील तपास
पोलिसांनी तांत्रिक आणि पारंपारिक पद्धतीने तपास करून मूळ पालघरचा रहिवासी असलेल्या रविंद्र गवते याला अटक केली. रविंद्र गवते हा गणेशपुरी येथे शेतमजूर म्हणून आला होता. आरोपीने महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणाने केली आणि त्याने लैंगिक अत्याचार केला आहे का, याचा सखोल तपास गणेशपुरी पोलीस करत आहेत.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…