क्राईम न्यूज

Bhiwandi Crime Branch : भिवंडी गुन्हे शाखेचा ‘दणका’! चेन स्नॅचिंग आणि पोलीस बतावणीचे 18 गुन्हे उघड; सोन्याच्या दागिन्यांसह 21 मोबाईल जप्त

Bhiwandi Crime Branch Latest News : भिवंडी, कल्याण, ठाणे आणि रेल्वे हद्दीतील गुन्ह्यांचे धागेदोरे सापडले; अट्टल गुन्हेगारांसह सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांनाही बेड्या

ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तांच्या Thane Police आदेशानुसार गुन्हे शाखेने चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कल्याण-भिवंडी बायपासवर सापळा रचून रविंद्र धनाजी भोसले या 24 वर्षीय अट्टल चोरट्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, भिवंडीसह ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि कर्जत-पुणे रेल्वे हद्दीत केलेले तब्बल 16 गुन्हे उघड झाले. या गुन्हेगाराने लुटलेले सोन्याचे दागिने आंबिवली येथील एका सोनाराला विकले होते, पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून 15 तोळे सोन्याचे दागिने आणि 21 मोबाईल असा एकूण 8 लाख 55 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. Thane Police Latest News

दुसऱ्या एका महत्त्वाच्या कारवाईत, पोलीस असल्याची खोटी बतावणी करून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोळीचाही पोलिसांनी शोध लावला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील मोहम्मद अजीज जाफरी याला भिवंडीत संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शांतीनगर आणि नारपोली परिसरात नागरिकांना पोलीस असल्याचे भासवून लुटल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, या चोरीचा माल खरेदी करणाऱ्या कर्नाटकच्या बिदर येथील व्यापाऱ्यालाही गजाआड केले आहे.

अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-2 च्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. या कारवाईमुळे रेल्वे प्रवासी आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या टोळ्यांचे कंबरडे मोडले असून, ठाणे पोलिसांनी आपल्या ‘स्ट्राईक रेट’ने पुन्हा एकदा गुन्हेगारांना सज्जड इशारा दिला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago