Bhiwandi Crime Branch Unit 1 Latest News : व्यवसायातील वादातून मालकावर केला होता चाकूने हल्ला; गुन्हे शाखा कक्ष-1 ची जौनपूरमध्ये धडाकेबाज कारवाई
भाईंदर | भाईंदर पूर्व येथील रागदेव पार्क परिसरात मंडप डेकोरेटर्स व्यावसायिकाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुषार संतोष दुबे (वय 23) या आरोपीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून अटक केली आहे. व्यवसायातील कामाच्या वाटपावरून झालेल्या वादातून आरोपीने आपल्याच मालकावर धारदार चाकूने सपासप वार केले होते.
नेमकी घटना काय?
रागदेव पार्क येथील रहिवासी आणि मंडप डेकोरेटर्स व्यावसायिक दशरथ मांगीलाल शर्मा (वय 27) यांच्याकडे आरोपी तुषार दुबे हा कामाला होता. 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास, इव्हेंटचे काम देण्याच्या कारणावरून दशरथ शर्मा आणि तुषार यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात तुषारने आपल्याकडील चाकूने दशरथ शर्मा यांच्या पोटावर, पाठीवर आणि कंबरेवर गंभीर वार केले. शर्मा यांना रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात Navghar Police Station भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109 (जीवे मारण्याचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उत्तर प्रदेशात असा लागला शोध
गुन्हा केल्यावर आरोपी तुषार दुबे हा थेट उत्तर प्रदेशात पळाला होता. तिथे तो पकडले जाऊ नये म्हणून सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत होता. मात्र, गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांमार्फत त्याचा माग काढला. आरोपी जौनपूर येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले. 1 जानेवारी 2026 रोजी पोलिसांनी जौनपूरमधून त्याला ताब्यात घेतले.
पुढील कारवाई
जौनपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून आरोपीची ट्रान्झिट रिमांड मिळवून त्याला भाईंदरमध्ये आणण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आरोपीला नवघर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपास पथक
ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप-आयुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 चे प्रभारी सुशिलकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, योगेश काळे, उमेश भागवत आणि त्यांच्या पथकाने सायबर शाखेच्या मदतीने केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…