मुंबई

Bhiwandi Bribe News : लाच प्रकरणी अभियंत्याविरोधात गुन्हे दाखल

•भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला असून, दोन लाख वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

भिवंडी :- ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भिवंडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.पंचायत समितीचे देयक बनविण्यासाठी अभियंत्याने ठेकेदाराकडून दोन लाख 20 हजार रुपये मागितल्याचे समोर आले आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी भिवंडी येथील बंदिस्त गटाराचा ठेका घेऊन काम पूर्ण केले होते. तसेच यापूर्वी देखील त्यांनी तीन कामे पूर्ण केली होती. या कामांचे आणि बंदिस्त गटाराचे देयक बनिवण्यासाठी भिवंडी पंचायत समितीचा शाखा अभियंता प्रमोद जुमळे याने ठेकेदाराकडून दोन लाख 40 हजार रुपयांची मागणी केली होती. यानंतर ठेकेदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली.

पथकांनी पडताळणी केली असता, जुमळे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पथकाने सोमवारी सापळा रचला. या सापळ्यात पथकाने जुमळे याला दोन लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

35 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago