क्राईम न्यूजठाणेमुंबई

Bhiwandi Bike Robbery News : ऑटो रिक्षासह पाच दुचाकींची चोरी, दोन सराईत चोरट्यांना जेरबंद

Bhiwandi Nijampur Police Arrested Bike Robbers : भिवंडी शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, निजामपुरा पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे. यात निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येथून अज्ञात चोरट्यांनी ॲक्टीव्हा चोरून नेली.

भिवंडी :- शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, शहरातील निजामपुरा पोलीस ठाण्यांत Nijampur Police Station वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली आहे.यात निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अज्ञात चोरट्यांनी ॲक्टीव्हा दुचाकी चोरून नेली. Bhiwandi Bike Robbery याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

निजामपुरा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग करीत असताना दोन व्यक्ती संशयितरित्या फिरत असताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांचीही विचारपूस केली असता त्या दोघांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची सफल चौकशी केली असता त्यांनी भिवंडीत ॲक्टीव्हा चोरी संदर्भातील गुन्हे दाखल असल्याचे कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना सखोल चौकशी केली असता आरोपी हे पोलीस ठाण्यात विविध वाहन चोरीच्या घटनेत सहभागी असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच मोटरसायकल आणि एक ऑटो रिक्षा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फैजान रमजान अन्सारी, (वय 19) आणि समीर जमशेद अन्सारी (वय 20) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. हे दोघेही भिवंडीच्या अन्सारी रोड आणि ग्रीन पार्क या परिसरात राहणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2, भिवंडी, मोहन दहिकर, सहा‌य्यक पोलीस आयुक्त, दिपक देशमुख,पोलीस निरीक्षक, संजय जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन जोगदंड यांचे मार्गदर्शना खाली तपासपथक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय बडगीरे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक राजेद्र आल्हाट, पोलीस हवालदार मारोती भारती, पोलीस नाईक प्रविण सोनवणे, विकास सोनवणे, पोलीस शिपाई रूपेश साबरे,ज्ञानेश्वर कोळी, शनिप्रसाद मुंडे, अनिल सापते यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0