Bhiwandi Bar Raid News : भिवंडीच्या लैला ऑर्क्रेस्ट्रा बार आणि रेस्टाॅरंट या बारवर ठाणे क्राईम ब्रांचचा छापा

Thane Crime Branch Latest Raid News : भिवंडी बायपास येथील रांजनोली परिसरात लैला ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टाॅरंटवर ठाणे गुन्हे शाखेने छापा मारला असून, बारडांसरसह 15 जणांवर गुन्हा
भिवंडी :- भिवंडी बायपास भागात असलेल्या लैला ऑर्क्रेस्ट्रा बार आणि रेस्टाॅरंट या बारवर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला. Thane Crime Branch Latest Raid News या छाप्यात पोलिसांनी तीन बारडान्सर, हाॅटेलचे मॅनेजर, ग्राहक यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तोकडे कपडे परिधान करुन बारबाला अश्लील हावभाव करत होते. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात Konagon Police Station News याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, 117 आणि भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 296, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. Thane Police Latest Crime News
भिवंडी बायपास येथील रांजनोली परिसरात लैला ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टाॅरंट आहेत. रात्री उशीरापर्यंत हा ऑक्रेस्ट्रा बार सुरु असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या कल्याण युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शुक्रवारी रात्री कल्याण युनीटचे पथक घटनास्थळी गेले. त्यावेळी बारच्या तळमजल्यावर काही महिला तोकडे कपडे परिधान करुन ग्राहकांसमोर बसल्या होत्या. तर बारच्या पहिल्या मजल्यावर देखील अशाच प्रकारे ऑर्क्रेस्ट्रा सुरु असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दोन मॅनेजर, 16 महिला गायक, तीन बारबाला, चार पुरुष वेटर, पाच ग्राहक अशा सर्वांची चौकशी सुरु केली. पोलिसांनी याप्रकरणात 15 हजार 140 रुपयांची रोकड देखील जप्त केली. Thane Police Latest Crime News


