लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे ; लाच स्वीकारताना अटक करणाऱ्या पोलीस कर्मचारी याने पोलीस उपाधीक्षक यांना धक्का देऊन पळ
भिवंडी :- निळकंठ खडके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो निजामपूरा पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे. त्याने तक्रारदार यांच्याकडून गुन्ह्यामध्ये अटकेपासून दूर ठेवण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांचे भिवंडी आग्रारोड परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत वाद झाले होते. तक्रारदारविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांना अटकेपासून संरक्षण देण्यासाठी निळकंठ खडके याने त्यांच्याकडून 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 29 हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचवर प्रतिबंध विभागाने सापळा रचून भिवंडी येथील निजामपूरा पोलीस ठाण्यातील लाचखोर कर्मचाऱ्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पथकाला चकवा देऊन लाचखोर कर्मचारी लाचेची रक्कम घेऊन पळून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Anti Corruption Bureau News
सोमवारी (10 जुन) पथकाने पडताळणी केली असता खडके याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी (11 जुन) पथकाने सापळा रचला. खडके याने शासकीय दुचाकीने तक्रारदार यांना एका ठिकाणी नेले. तिथे त्याने 29 हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेतली. त्यानंतर खडके हा निजामपूरा पोलीस ठाण्यात आला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात पाहताच, त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस उपअधिक्षक विशाल जाधव यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने जाधव यांना धक्का दिला. तसेच तेथून पळून गेला. याप्रकरणी त्याच्याविरोधात 353,323,294,506,34 प्रमाणे निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Anti Corruption Bureau News
सुनिल लोखंडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे,गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे महेश तरडे, अपर पोलीस अधीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो, विशाल जाधव पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडून आरोपीचा शोध घेतला जात असून लवकरच लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात येणार आहे असल्याचे सांगितले जात आहे. Anti Corruption Bureau News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…