भाईंदर : बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी, पत्रकार अटकेत

Mira Bhayandar Press Reporter Money Extortion News : बांधकाम विकासाला महानगरपालिकेमध्ये तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैसे मागणारा पत्रकार पोलिसांच्या जाळ्यात
भाईंदर :- भाईंदर मधील रॉयल स्कूल जवळ धावगी, उत्तन, भाईंदर येथे भावेश परशुराम पाटील (36 वय ) यांचे बांधकाम चालू होते. या बांधकामा संदर्भात महानगरपालिकेमध्ये तक्रार करून अशी धमकी पत्रकार सतिश भारव्दाज व सुधीर महाडिक यांच्याकडून देण्यात आली होती.परंतु वैभव पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला असता पत्रकार सतिश भारव्दाज व सुधीर महाडिक असे वैभव पाटील यांचे चांधकाम साईटवर जाऊन त्यांचे बांधकामाचे फोटो काढून त्याची वर्तमान पत्रात प्रसिध्दी करण्याची व महानगरपालिकेत तक्रार करण्याची धमकी देवून Mira Bhayndar Press Reporter Money Extortion एक लाख रुपयांची मागणी केली होती.परंतु वैभव पाटील यांनी पैसे देण्यास नकार दिला.
भावेश पाटील यांचे बांधकामाचे साईट जवळच इकरा सिद्दिकी यांची साईटवर जाऊन महिलेला देखील त्याचप्रमाणे बांधकामाची तक्रार करण्याची धमकी देवुन त्यांचेकडे पंचवीस हजार रुपयांची मागणी केली होती.त्यांनी ही पैस देण्यास नकार दिला. इकरा सिद्दिकी हिने दोन पत्रकार यांनी शिवीगाळ केली त्यामुळे महिलेने केलेल्या आरडा ओरडीमुळे कांही लोकांनी तेथे येवून दोन्ही पकडून ठेवल. त्यानंतर इसमांनी माफी मागीतल्याने त्यांना सोडून दिले तसे ते मोटार सायकलवरुन निघुन गेले.पुन्हा सुधीर महाडिक यांना भावेश पाटील यांना पुन्हा फोन करुन बांधकामाची तक्रार करण्याची धमकी देवून (G-Pay व्दारे पाच हजार रु) पाठविण्यास सांगीतले. त्यांनी सुधीर महाडिक यांचे मोबाईलवर दोन हजार G-Pay व्दारे पाठविले.
भावेश पाटील यांनी 30 जानेवारी 2025 रोजी उत्तन सागरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भारतीय न्यास संहिता 2023 चे कलम 308 (2), 3 (५5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास शिवाजी नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व हेमंत कहाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी अडसुळे, उत्तन सागरी पोलीस ठाणे हे करत आहेत.