Kashmira Police Busted Sex Racket In Dahisar : काशिमिरा पोलिस ठाणे हद्दीत दहिसर चेक नाका परिसरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती.
भाईंदर :- दहिसर चेक Dahisar नाकाच्या परिसरात पैशाच्या मोबदल्यात व्हाट्सअप द्वारे चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर Sex Racket पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. Crime Branch तेथून तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून तेथे अवैध धंदा सुरू होता.
पुमा आऊटलेट पाकींग, अहमदाबाद- मुंबई महामार्ग, दहिसर चेक नाका, काशिमिरा परिसरात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. त्यानुसार मीरा-भाईंदर वसई विरार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून तेथे छापा टाकला.या वेळी तेथील तीन महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर काशिमिरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 2023 चे कलम 143(3),3(5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेश्यादलाल रवि उर्फ मनोज बुलेश्वर यादव, (वय 31 वर्ष, सध्या रा. चप्पल रोड गल्ली, बांद्रा प.. मुंबई, मुळ राहणार बिहार ) व त्याचा साथीदार सुभाषकुमार कुलेश्वर यादव, (वय-24, सध्या राहणार चप्पल रोड गल्ली, बांद्रा प., मुंबई, मूळ राहणार झारखंड) व त्यांचे साथीदार पाच पाहिजे आरोपी सर्व राहणार बांन्द्रा (प.) मुंबई यांनी आपसात संगणमत करुन 3 पिडीत मुलीला वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करुन वेश्या व्यवसायाच्या कामातून विशिष्ट रक्कम या पीडित महिलेला दिले जात. पोलिसांनी सापळा रचून वेश्याव्यवसायाचा दलाली करणार सुभाषकुमार यादव याला पंचासमक्ष पैसे स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून पीडित महिलेची सुटका केली असून उर्वरित पाच आरोपीच्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील,शिवाजी पाटील, रामचंद्र पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत, महिला पोलीस हवालदार शितल जाधव, पोलीस हवालदार सम्राट गावडे सर्व नेमणक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर तसेच पोलीस हवालदार नम्रीता यादय, महिला पोलीस शिपाई चैताली सानप, नेमणुक गुन्हे शाखा यांनी केली आहे.