Bhayandar Share Market Fraud : Facebook group वरील शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष पडले महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक, सायबर पोलीसांची दमदार कामगिरी
•शेअर मार्केट गुंतवणुकीमध्ये फेसबुकच्या माध्यमातून केलेल्या ट्रेडिंग मधून तब्बल 21.93 लाखांची फसवणूक, सायबर पोलीसांचे दमदार कामगिरी करत फसवणुकीतील संपूर्ण रक्कम परत मिळवून देण्यात यश
भाईंदर :- फेसबुकच्या ग्रुप वरील शेअर बाजारातील कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर भामट्याने दिले होते. आर्थिक लोभाला बळी पडत भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सांगवी यांनी फेसबुक शेअर ट्रेडिंग मध्ये तब्बल 21 लाख 93 हजार 279 रुपयांची गुंतवणूक केली होती. मोठ्या प्रमाणावर नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात सायबर विभागाने सांघवी यांच्या गुंतवणुकीतील फसवणुक झालेली रक्कम सायबर पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा त्यांच्या मूळ खात्यात आणून देण्यास सायबर पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 406, 34 प्रमाणे फेसबुक ट्रेडिंग मध्ये फसवणूक झालेल्या 21 लाख 93 हजार रुपये तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार सांघवी यांनी फेसबुक वर शेअर ट्रेडिंग करून अधिक नफा मिळवण्याचे जाहिराती पाहिल्या होत्या त्या जाहिरातीमध्ये व्हाट्सअप ग्रुप मध्ये मेसेज करून तक्रारदार यांनी मोबाईल क्रमांक ऍड केला. त्यानंतर नफा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी एकूण 21 लाख 93 हजार 279 रुपयाचे गुंतवणूक केली होती. परंतु आपली फसवणूक झाली हे लक्षात येतात सायबर पोलिसांना त्या संदर्भात तक्रार केली पोलिसांनी तक्रारदार आणि आरोपी यांच्या व्यवहाराचे अवलोकन करून तक्रार यांनी पाठवलेले रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सर्व रक्कम गोठविले आणि त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बँकेची पत्रव्यवहार करून तक्रारदार यांच्या मूळ खात्यावर फसवणूक झालेली 21 लाख 93 हजार 269 रुपये परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.
पोलीस पथक
अधिनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.प.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, कुणाल सावळे, पोलीस अंमलदार शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे.