क्राईम न्यूजमुंबई
Trending

Bhayandar Sexual assault : धक्कादायक! चॉकलेट आईस्क्रीमचं आमिष दाखवून 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Sexual assault with 7-year-old minor girl  : चॉकलेट, आईस्क्रीमचं आमिष दाखवून एका अल्पवयीन 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात बलात्कार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला उत्तर प्रदेश मधून पोलिसांनी अटक केली.

भाईंदर :- चॉकलेट, आईस्क्रीमचं आमिष दाखवून 7 Sexual assault with 7-year-old minor girl वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 20 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भाईंदर येथील एका सोसायटीच्या टेरेसवर घडली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.कलम 64,65(2),74 सह बालकाचे लैंगिक बलात्कारासह अपराधांपासून संरक्षण अधि कलम 4,5,(एम),8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेश मधून बेड्या ठोकल्या आहे. रमेशकुमार रामरक्षा जयसवाल (वय 20) असं आरोपीचे नाव आहे. Vasai Virar Latest Crime News

पोलीस आयुक्त यांनी या संवेदनशील गुन्हयांतील आरोपी याचा शोध घेण्यासाठी आदेशीत केले होते. गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमिराचे अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथक गुन्ह्यांतील पाहीजे आरोपी यांचा शोध घेत होते. यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा कक्ष-1 येथुन दोन तपास पथके, राजकोट, राज्य राजस्थान व प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश येथे पाठविण्यात आलेली होती. गुन्हयातील आरोपी रमेशकुमार रामरक्षा जयसवाल (वय 20 वर्ष, मूळ रा.प्रयागराज) 8 नोव्हेंबर रोजी गठेवरा चौकी, मेजा रोड, प्रयागराज, जिल्हा प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश येथे पोलीस हवालदार संजय शिंदे व संतोष लांडगे यांचे पथकाला मिळून आलेला आहे. आरोपी यांचेकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपी यास मुख्य न्यायिक मॅजीस्ट्रेट, न्यायालय प्रयागराज यांचे न्यायालयातुन ट्रान्झीट रिमांड घेवुन आरोपीस पुढील कारवाई करण्यातकरीता नवघर पोलीस ठाणे येथे आणण्यात येत आहे. Vasai Virar Latest Crime News

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त‌ पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाख्खा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक निखील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजु तांबे, पोलीस हवालदार संजय शिंदे, संतोष लांडगे, अविनाश गर्जे, प्रकाश गायकवाड, सचिन हुले, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, पोलीस अंमलदार धिरज मेंगाणे, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी कारवाई केली आहे. Vasai Virar Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0