Bhayandar Sex Racket : भाईंदरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! कॉलेज तरुणीला देहव्यापारात ढकलणारी महिला दलाल जेरबंद

Navghar Police Busted Bhayandar College Girl Sex Racket : नवघर पोलिसांची ‘सुरभी वडापाव’ जवळ धाडसी कारवाई; पीडित तरुणीची सुटका, बीएनएस आणि पीटा अंतर्गत गुन्हा दाखल
भाईंदर | मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नवघर पोलीस ठाण्याच्या Navghar Police Station पथकाने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा छडा लावला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलणाऱ्या एका महिला दलालाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकणाऱ्या तरुणीची पोलिसांनी नरकातून सुटका केली आहे. Bhayandar Police Latest News
बोगस ग्राहकाद्वारे रचला सापळा मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी भाईंदर पूर्व रेल्वे स्टेशनसमोरील प्रशांत हॉटेल आणि सुरभी वडापाव परिसरात सापळा रचला होता. पोलिसांनी एक बोगस ग्राहक पाठवून महिला दलालाशी संपर्क साधला. व्यवहार निश्चित होताच पोलिसांनी छापा टाकून महिला आरोपीला रंगेहाथ पकडले. Bhayandar Sex Racket News
5 वर्षांपासून सुरू होता काळा बाजार प्राथमिक तपासात समोर आले आहे की, ही महिला दलाल गेल्या 4 ते 5 वर्षांपासून मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार परिसरात हे रॅकेट चालवत होती. ती ग्राहकांना कॉलेज तरुणींचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठवून त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त करत असे. पोलिसांनी रेस्क्यू केलेली मुलगी मुंबईतील एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये शिकत असून तिला आता सुधारगृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांची मोठी कारवाई या प्रकरणी नवघर पोलिसांनी महिला आरोपीवर बीएनएस (BNS) आणि पीटा (PITA) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती तरुणींना अडकवण्यात आले आहे आणि या महिलेचे आणखी कोण साथीदार आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढूमे, पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत व्हनमारे आणि त्यांच्या टीमने केली आहे.



