क्राईम न्यूजमुंबई
Trending

Bhayandar Rape News : 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार

Bhayandar Police Arrested Rape Accused: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली.

भाईंदर :- अल्पवयीन मुलीचे अपहरण Minor Girl Rape करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला नवघर पोलिसांच्या गुन्हे Navghar police प्रकटीकरण पथकाच्या पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी पोलिसांनी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली. Bhayandar Police Station Latest News

राज्यात मागील काही दिवसांपासून बलात्काराच्या घटना वाढत असताना अशा संवेदनशील विषयावर पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपीला जेरबंद केले आहे. नवघर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आईने दिलेल्या तक्रारीवरून 14 वर्षे मुलगी तिच्या दोन मैत्रिणींना सोबत गेली होती. आईच्या म्हणण्यानुसार आरोपीने मुलीला फुस लावून पळून नेल्याचे सांगितले आहे. मुलगी हिंदूधर्मीय असून आरोपी हा इतर धर्माचा असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.पोलीस उपायुक्त परिमंडळ-1, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिला. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे अल्पवयीन मुलीसह तिच्या दोन मैत्रिणींचा शोध घेऊन त्यांची सुटका केली आहे. परंतु पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता 2023 चे कलम 64,3(5), सह बालकाचे लैंगिक पण आजपासून संरक्षण अधिनियमन 2012 चे कलम 4,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम संकुडे करीत आहेत. Bhayandar Police Station Latest News

मधुकर पांण्डेय, पोलीस आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01 राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नवघर विभाग यांचा मार्गदर्शनाखाली धिरज कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नवघर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक अशोक कांबळे (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम सकुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसचे, पोलीस हवालदार संतोष पाटील, पाटील, सुरेश चव्हाण, पुगे, जयप्रकाश जाधव, पोलीस शिपाई घुणावत, ओंकार यादव, मुकेश निकम, अस्वार, पवार तसेच कुणाल हिवाळे यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0