Bhayandar Police News : उत्तराखंड राज्यातून येऊन मुंबई व जवळच्या परिसरात चोरी करणार्या चार सराईत गुन्हेगारांना मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे
भाईंदर :- आंतरराज्यीय सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत चार आरोपींना अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. Crime Branch आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 17 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींच्या विरोधात पाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हे चारही आरोपी उत्तराखंड राज्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
भाईंदर पूर्वेकडील काशी नगर परिसरातून दुकानातून सामान घरी घेऊन जाताना खंडोबाची बिल्डिंग येथे राहणाऱ्या दिनाक्षी पाटील (50 वय) या महिलेला बोलण्यात गुंतवून हातचालाकीने दोघांनी गळ्यातील सोन्याची चैन आणि सोन्याचे कानातले पिशवीत घालण्यास सांगुन दिशाभूल करून सोने घेऊन फरार झाल्याची तक्रार नवघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात 318 (4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांनुसार मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देत तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी हे उत्तराखंड राज्यातील असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. चार आरोपी रेल्वेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून आरोपींना गांधीनगर गुजरात येथून अटक केली आहे.
अटक आरोपींची नावे
1.आयुब कलुया हसन (वय 26)
2.फारुखअली लोहरी शाह (वय 34)
3.नौशाद अलीमुद्दीन हसन (वय 28)
4.जलालुद्दीन लोहरी शाह (वय 45)
आरोपीकडून 17 तोळे वजनाचे 14.23 लाख रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हा करताना वापरलेल्या 1.15 लाख रुपये किंमतीच्या 2 मोटार सायकल, रोख रक्कम, 4 गोबाईल फोन असा एकूण 15 लाख 67 हजार 357 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबूरे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, प्रशांत गांगुर्डे, नितीन बेद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार संतोष मदने, शिवाजी पाटील, विजय गायकवाड, रविंद्र भालेराव, गोविंद केंद्रे, विकास राजपुत, संदिप शेरमाळे, प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी, समीर यादव, रचिंद्र कांबळे, नितीन राठोड, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण, सचिन चौधरी तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संजय चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुमेर सिंग, पोलीस हवालदार मोगल नेमणुक रेल्वे सुरक्षा बल, गांधीनगर, गुजरात यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…