Bhayandar Police News : ज्येष्ठ महिलाच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक

Bhayandar Navghar Police Latest News : नवघर पोलिसांची कारवाई ; 48 हजार रुपयांची सोन्याची चैन पोलिसांनी केली हस्तगत आरोपीला अटक
भाईंदर :- सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात नवघर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी चोरी मध्ये चोरलेली 48 हजारांची चैन परत केली आहे. अशी माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे. Bhayandar Navghar Police Latest News
फिर्यादी महिला शांती सखाराम खापरे (70 वय ) या बालकृष्ण लीला सोसायटी तलाव रोड, मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे ऑफिस जवळील ल राहणारे असून त्या घरकाम करत असतात. 11 मे च्या दुपारी फिर्यादी महिला घरकाम करून घरी परत येत असताना तलाव रोड परिसरात फिर्यादी यांना एका 20 ते 25 वयोगटातील तरुणाने अटकाव करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची 48 हजार रुपयांची चैन हिसकावून तिथून पळ काढला होता. त्या संदर्भात नवघर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली होती महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय सहिता 309(4) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
पोलीस आयुक्तालयात एकापाठोपाठ चैन चोरीच्या घटना घडल्या. त्यामुळे अशा गुन्हयांना आळा घालणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत वरिष्ठांनी तात्काळ मार्गदर्शन व सुचना देवून पथके रवाना केली. त्याअनुषंगाने नवघर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यानी घडणाया प्रत्येक चैन स्नॅचिंग गुन्हयाचे घटनास्थळी भेटी देऊन तांत्रिक विश्लेषण केले.या गुन्हयातील आरोपीचा भाईंदरमध्ये माग घेण्यात आला. आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर रितीक श्यामबहादुर सिंग (25 वय) निष्पन्न केले आहे. पोलिसांनी तीन तासाच्या आत कौशल्यापूर्वक तपास करून आरोपीला जेसलपार्क भाईंदर पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान तपास केला असता त्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातून जबरीने खेचून गेलेली परत केली असून आरोपीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे करीत आहे.


