Bhayandar Police Arrested Cyber Fraudster : बनावट अॅप, बनावट कंपनी, बनावट नफा… पण पोलिसांची अटक खरी! सायबर गुन्हेगारीच्या अंधाऱ्या गुहेतून उलगडली ही थरारक कथा
भाईंदर :- दहिसरच्या एका तरुण लेखापालाने आर्थिक स्वप्नांची उंच भरारी घेण्याच्या नादात आपली सगळी कमाई गमावली – तीही केवळ एका बनावट शेअर ट्रेडिंग अॅपच्या भुलाव्यामुळे!
एक व्हॉट्सअॅप मेसेज, एक गुगल लिंक, आणि बनावट फायदे दाखवणारे स्क्रीनशॉट – एवढ्याच पायऱ्यांत हा तरुण ‘गणपती ट्रेड’ नावाच्या ग्रुपमध्ये सामील झाला. सुरुवातीला भासणारा फायदा, प्रीमियम ग्रुपची मागणी, आणि शेवटी ‘मास99’ हे एक अज्ञात अॅप – यातून सुरू झाली कोट्यवधींच्या सायबर फसवणुकीची ही खळबळजनक मालिका.
3 कोटी 69 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर जेव्हा ही रक्कम परत घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ‘अधिक पैसे भरा’ असं सांगण्यात आलं. आपली फसवणूक झाल्याचं कळताच तक्रारदाराने दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांकडे Cyber Cell धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अदनान शमशुद्दीन खान आणि मोहम्मद तन्वीर खान यांना गोरेगाव व काशिमिरा परिसरातून अटक केली. Bhayandar Police Arrested Cyber Fraudster
तपासात समोर आलं की, आरोपींनी बनावट कंपन्यांद्वारे बँक खात्यांची साखळी उभी केली होती. लाखो रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये फिरवून, नंतर ते काढून घेतले जात होते. एका बनावट कंपनीच्या नावाने चालवलेली CWFS प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था फक्त कागदावरच अस्तित्वात होती.
ही घटना केवळ एक आर्थिक फसवणूक नाही, तर ती डिजिटल विश्वासघाताची जीवराहाट आहे.
सायबर गुन्ह्याचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे – आणि गुन्हेगार हे केवळ संगणकासमोर बसलेले मास्टरमाइंडच नसून, आपल्या समोरच वावरत असलेली सायबर छाया आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…