IPL 2025 Updates : “अखेरचा घाव अय्यरचा!” – मुंबईची स्वप्नं कोसळली, पंजाब थेट फायनलमध्ये!

•अय्यरचा बुमराहवर ‘स्ट्रोक ऑफ द टूर्नामेंट’, अंतिम फेरीत आरसीबीची दमदार टक्कर,मुंबईच्या २००+ धावांचा पाठलाग करत पंजाबने दाखवली ‘राजा’गिरी
थरार, संघर्ष आणि ‘कॅप्टन कूल’चा आत्मविश्वास! आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या नेतृत्वगुणांची पुन्हा एकदा मोहोर उमटवली.
पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 203 धावांचा डाव मांडला. जॉनी बेअरस्टो, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी आक्रमक फटकेबाजी केली, पण ‘डेथ ओव्हर्स’मध्ये अपेक्षित स्फोटकता गहाळ होती. हार्दिक पांड्याचा अपयश आणि बुमराहचा अपधार्जिन काळ मुंबईसाठी महागात पडला.
पंजाबची फलंदाजी डळमळीत झाली होती. शशांकच्या रनआउटनंतर अय्यरने नजरेत आग आणि बॅटमध्ये वीज घेऊन मैदान गाजवलं. 41 चेंडूत नाबाद 87 धावा, त्यात 8 षटकार आणि 5 चौकार! एक शॉट विशेष चर्चेत राहिला — जसप्रीत बुमराहच्या परफेक्ट यॉर्करवर अय्यरने फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमारेषेच्या पार!
नेहाल वढेरानेही धैर्याने साथ देत 29 चेंडूत 48 धावा ठोकल्या सामन्यानंतर एक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं – शशांकच्या रनआउटनंतर संतप्त अय्यर काहीसे झापल्यासारखा दिसला. कारण त्याच्या डोळ्यात फक्त विजय होता, चूक माफ नव्हती.
सामना जिंकताच मैदानावर अय्यरच्या डोळ्यात झळकलेली चमक एक गोष्ट स्पष्ट करत होती — हा माणूस केवळ फलंदाज नाही, तर नेतृत्वातही दिग्गज आहे. आता तो आयपीएल इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे, ज्याने तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरी गाठून दिली आहे — दिल्ली, केकेआर आणि आता पंजाब!
3 जून रोजी पंजाबचा सामना आरसीबीशी रंगणार आहे — क्रिकेटचा ‘महासंग्राम’ अगदी काही तासांवर येऊन ठेपलाय. आता फक्त एक पाऊल आणि इतिहास घडणार!



