क्राईम न्यूज

Bhayandar Cyber Awareness : ‘सायबर धोक्यां’पासून वाचायचंय? भाईंदरमध्ये 400 नागरिकांनी घेतले ‘सुरक्षित इंटरनेट’चे धडे!

Bhayandar Cyber Awareness : 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून 70 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सहभाग; पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार ‘पद्मावती नगर उत्सव मंडळा’त महत्त्वाचा कार्यक्रम

मीरा-भाईंदर :- आजच्या डिजिटल युगात सायबर गुन्हेगार प्रत्येक क्लिकवर आणि प्रत्येक ऑनलाइन व्यवहारावर नजर ठेवून आहेत. या पार्श्वभूमीवर, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने नागरिकांच्या सुरक्षेची ढाल अधिक मजबूत करण्यासाठी एक प्रभावी मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून, भाईंदर पश्चिम येथील “श्री. पद्मावती नगर उत्सव” मंडळाच्या सहकार्याने भव्य सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. Bhayandar Cyber Awareness

पोलीस आयुक्त यांच्या विशेष संकल्पनेतून आणि गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली 23 सप्टेंबर 2025 रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लहान मुले, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक (05 ते 7वयोगट) अशा एकूण 400 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

सायबर गुन्हेगारीचे नवे ‘ट्रेंड’ उघड

सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी यावेळी अत्यंत सोप्या भाषेत अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनी सध्या समाजात घडणारे ‘ट्रेंडिंग सायबर क्राइम्स’ जसे की ओटीपी फ्रॉड (OTP Fraud), क्यूआर कोड स्कॅम, सोशल मीडियावरील फसवणूक याबद्दल सविस्तर माहिती दिली.

पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांनी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना आणि सोशल मीडियावर वावरताना कोणती ‘डिजिटल पथ्ये’ पाळणे आवश्यक आहे, हे समजावून सांगितले.

धोका झाल्यास काय कराल? ’15 मिनिटांचा गोल्डन पिरियड’

कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण होते ते म्हणजे ऑनलाइन फसवणूक झाल्यास नागरिकांनी तातडीने काय करावे यावर दिलेले मार्गदर्शन. गुन्ह्यास बळी पडल्यास त्वरित www.cybercrime.gov.in किंवा 1930/1945 या हेल्पलाईनवर संपर्क कसा साधावा, याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. (फसवणूक झाल्यानंतरचे पहिले काही तास म्हणजेच गोल्डन पिरियड असतो, ज्यात पैसे परत मिळण्याची शक्यता अधिक असते.)

मंडळाचे अध्यक्ष मनोज सांघवी आणि इतर सदस्यांच्या (किर्ती जैन, दिनेश नाहर, डॉ. विवेकानंद शानभाग इ.) सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम 100 टक्के यशस्वी झाला.

vivek

Recent Posts