मुंबई

Bhayandar Crime News : घरफोडी करून गायब झालेला ‘सोन्या’चा चोर अखेर सापडला!

नवघर पोलिसांची चतुर कारवाई; लाखोंचा ऐवज इंदौर-उज्जैनपर्यंत जाऊन हस्तगत

भाईंदर | सुमारे 10 लाखांची घरफोडी करून गायब झालेल्या आणि तीन राज्यांमध्ये लपाछपी खेळणाऱ्या सराईत चोराला नवघर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अटक केली असून त्याच्याकडून रु. 3.61 लाखांचा ऐवज उज्जैन, इंदौर व नाशिक येथून हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीसह त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.

5 जानेवारी 2025 रोजी रात्री आणि 6 जानेवारीच्या पहाटे दरम्यान, भाईंदर पूर्वेतील म्हाडा इमारतीतील दीपिका शर्मा यांचे बंद घर फोडून सुमारे 9.95 लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली गेली होती. घरात दोन महिलांचे दागिनेही होते. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने नवघर पोलीस ठाण्याचे पथक सक्रिय झाले. तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सायबर विश्लेषणाच्या आधारे संकेत नितीन गायकवाड (26 वय, मूळ रा. श्रीगोंदा आहिल्यानगर), सध्या ठाणे याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. त्याच्यासोबत मनीष रविशंकर पांडे (28 वय , रा. नर्मदा नगर, भाईंदर पूर्व) यालाही अटक करण्यात आली.

या दोघांकडून अटकपूर्व चौकशीत आणि पोलीस कोठडीदरम्यान सखोल तपास करण्यात आला. तपासातून चोरी केलेला माल मध्य प्रदेशातील उज्जैन आणि इंदौर तसेच महाराष्ट्रातील नाशिक येथे विक्रीसाठी नेण्यात आल्याचे समोर आले. ती मालमत्ता नवघर पोलिसांनी हस्तगत केली आहे.

संकेत गायकवाड हा यापूर्वीही अनेक घरफोडी, चोरी व फसवणूक प्रकरणांत आरोपी आहे. या गुन्ह्यातील पोलिसांची ही धडाकेबाज कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

पोलीस पथक

पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे,पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड,सहायक पोलीस आयुक्त विवेक मराठे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी,सहायक पोलीस आयुक्त विवेक मराठे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर,पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर आसचे,पोलीस उप निरीक्षक संपत आहेर,सशस्त्र पोलीस हवालदार जयप्रकाश जाधव,पोलीस हवालदार संतोष पाटील,पोलीस हवालदार भूषण पाटील,पोलीस हवालदार सुरेश चव्हाण,पोलीस हवालदार नवनाथ घुगे,पोलीस हवालदार सुरजसिंग घुनावत,पोलीस हवालदार ओंकार यादव,पोलीस शिपाई संकेत मगर,पोलीस शिपाई नवनाथ पवार,पोलीस शिपाई उमेश अस्यार,कुष्णाल हिवाळे यांनी कारवाई केलेली आहे.

vivek

Recent Posts