Bhayandar Crime News : 27 वर्षापासून खुनाच्या गुन्हयात गुंगारा देणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
•काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 पोलिसांची कामगिरी ; आरोपीला दिल्लीतून अटक, 27 वर्षांपूर्वी गुन्हा केल्याची दिली कबुली
भाईंदर :- एम आय उद्योग नगर वासुदेव इंडस्ट्री इस्टेट येथे राहणाऱ्या विजय सिंग व त्याच्या दोन साथी दराने साईनगर बिल्डिंगच्या इमारतीवरून बिल्डिंगच्या शेजारी लगत असलेल्या गटारीमध्ये कचऱ्याची पिशवी घेतली कचऱ्याच्या पिशवी फेकल्याने गटारीमध्ये खराब पाणी प्रमोदकुमार सुतार पांडे (24 वर्ष), धरमनाथ रामशंकर पांडे यांच्या अंगावर उडाले होते त्यानंतर पांडे आणि चौहाण यांच्यात वाद झाला होता.चौहाण यांनी धरमनाथ पांडे यांच्या डोक्यावर बांबूने हल्ला केला या हल्ल्यात पांडे हे जखमी होऊन मृत्यू पावले होते. त्यानंतर प्रमोद कुमार पांडे यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेची तक्रार केली. पांडे यांच्या तक्रारीवरून चौहाण यांच्या विरोधात भादवि कलम 302 504 आणि 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना आरोपी विजयसिंग श्रीरामचंद्र चौहाण यांना 5 ऑक्टोंबर 1997 रोजी यांना अटक केली होती. परंतु त्यांच्यासोबत असल्या त्यांच्या साथीदार मेवालाल उर्फ पन्नालाल मुरत चौहाण आणि संशयित आरोपी राजेंद्र रामदूलार पाल या घटनेनंतर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच आझमगढ येथे पसार झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पोलिसांकडून आरोपीचा सातत्याने शोध घेतला जात होता परंतु आरोपी सातत्याने आपले वास्तव्य बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते.
मिरा भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे Avinash Ambure यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील गंभीर स्वरूपाच्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आणि पाहिजे असलेले आरोपी यांना तातडीने शोध घेण्याबाबत पोलिसांनी आदेशित केले होते. गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीराचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी तपास पथक तयार करून गुन्ह्यातील पाहिजे आरोपी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस हवालदार पुष्पेन्द्र थापा यांच्या गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून, आरोपी मिळवायला पन्नालाल मुरत चौहाण यांचा शोध घेत असताना तो दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा कक्ष-1 च्या पोलिसांनी त्वरित दिल्ली गाठून याला आरोपी याला अटक करण्यात आली आहे.आरोपी याचा मेट्रोपोलीटन मॅजीस्ट्रेट, नॉर्थ ड्रिस्ट्रीक्ट रोहीणी कोर्ट, नवी दिल्ली यांचे न्यायालयातुन ट्रान्झीट रिमांड घेवून आरोपीस पुढील कारवाई करीता भाईंदर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे,मदन बल्लाळ, सहाय्य पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलीस उप-निरीक्षक राजु तांबे, सहाय्यक फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा, अविनाश गर्जे, सुधीर खोत, पो.हवा. सचिन हुले मसुब किरण असवले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, सायबर विभाग यांनी 27 वर्षापासून फरार असलेला आरोपीला अटक करण्यात यश आहे.