मुंबई

Bhayandar Crime News : ऑनलाईन फसवणूक झाली, ‘या’ पोर्टलवर केली तक्रार, फसवणूकीतील 6.65 लाख मिळाले

Mumbai Police Online Fraud Cyber Cell सायबर सेल पोलिसांच्या तत्परतेमुळे एका पीडित व्यक्तीचे फसवलेले पैसे 4 महिन्यात खात्यात परत मिळाले आहे. 19 डिसेंबर रोजी पीडित व्यक्तीला बनावट कॉल मध्ये अडकवून सायबर चोरट्यांनी पीडितेच्या खात्यातून 6.65 लाख रुपये ट्रान्सफर केले.

भाईंदर :- ऑनलाईन आणि सायबर फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. सायबर गुन्हेगार स्वत:ला सरकारी अधिकारी बनवून लोकांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपये ऑनलाईन हडप करतात.सुशिक्षित लोकही डिजिटल पद्धतीने सायबर फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसून आले आहे. मीरा भाईंदर विरार वसई पोलीस आयुक्तालयातील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार भट्टाचार्य यांच्यासोबत झाली आहे. भट्टाचार्य यांना मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने कॉल करून त्यांची दिशाभूल करून त्यांच्या बँकेतील सहा लाख 65 हजार 785 रुपयांची ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडले होते.याबाबत सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

ऑनलाईन NCCRP Portal वर फसवणुकीची रक्कम ज्या संशयित खात्यात वर्ग झाली होती. ती पोलिसांना गोठविण्यात यश आले होते. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून बँकेची पत्रव्यवहार करून गोठविण्यात आलेली रक्कम चार महिने बँक आणि न्यायालय यांना पत्रव्यवहार करून संबंधित भट्टाचार्य यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे. सायबर पोलिसांनी भट्टाचार्य यांची सहा लाख 65 हजार 785 रुपये त्यांच्या मूळ खात्यात परत मिळून देण्यास यश आले आहे. भट्टाचार्य यांनी फसवणुकीतील पैसे परत मिळाल्यानंतर पोलिसांचे आभार मानले.

पोलीस पथक अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.प.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक, पोलीस शिपाई राहुल बन , महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, राजेश भरकडे यांनी पार पाडली आहे.

vivek

Recent Posts