मुंबई

Bhayandar Crime News : ऑनलाइन कार खरेदी करणे पडले महागडे! पाच लाखांची फसवणूक

•सायबर पोलिसांची दमदार कामगिरी ; फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश

भाईंदर :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाने धडाकेबाज कामगिरी करत फसवणुकीतील पाच लाख रुपये परत मिळून देण्यास यश आले आहे. भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे शाहा यांनी ऑनलाईन कार खरेदी करण्यासाठी E-commerce सर्च करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका जाहिरातीमध्ये स्वस्त दरात फोर व्हीलर कार मिळत असल्याचे पाहिले. आणि त्या आमिषाला बळी पडत पाच लाख रुपयांचे फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.

सायबर पोलिसांनी दिलेलं माहितीनुसार, भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे शाहा‌ यांना फोर व्हीलर कार घ्यायची होती. त्याकरिता ते ई-कॉमर्सद्वारे वेगवेगळ्या जाहिराती पाहत होते. त्यादरम्यान एका जाहिरातीमध्ये पाहता त्यांना स्वस्त दरात फोर व्हीलर कार मिळत होती. त्यानंतर त्यांनी जाहिरातीमधील नंबर वर पाच लाख रुपये ऑनलाईन पाठविले. परंतु, कालांतराने ऑनलाइन रक्कम पाठवल्यानंतर जाहिरात दाराचा नंबर हा बंद होता आणि त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal number तात्काळ तक्रार नोंदवली होती.

ऑनलाइन तक्रारीवरून फसवणुकीतील वर्ग केलेली रक्कम संशयित बँक खात्यात थांबवण्यात आली होती. न्यायालयीन आणि बँकेच्या सोबत पत्रव्यवहार करून सदर व्यवहार रद्द करून, फसवणुकीतील रक्कम मूळ खातेदाराच्या बँक खात्यात जमा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच, पोलिसांनी प्रतीकात्मक चेक देऊन फसवणूक झालेल्या व्यक्तीची रक्कम परत मिळून दिल्याचे सांगितले आहे.

ही कारवाई अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली साबयर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस हवालदार कृणाल सावळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार सूवर्णा माळी यांनी पार पाडली आहे

vivek

Recent Posts