Bhayandar Crime News : भाईंदर पोलिसांची कारवाई, खोट्या कागदपत्राद्वारे जमिनीची विक्री करणाऱ्या आरोपींना अटक

•मयत व्यक्तीचे आधार कार्ड, पॅन कार्ड खोटे कागदपत्र तयार करून जमिनीचे विक्री, कोट्यावधीची जमिनी लाखांत विकली
भाईंदर :- खोटे कागदपत्र तयार करून जमिनीची विक्री करणाऱ्या एका टोळीला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. चक्क मयत जमीन मालकाचे खोटे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि कागदपत्र तयार करून जमिनीची विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी कोट्यावधीची जमीन लाखो रुपयांमध्ये विक्री केली आहे.
दिपक शशिकांत शहा,(व्यवसाय-व्यापार,रा. बैंग्लोर, कर्नाटक) यांचे फिर्यादीवरुन भाईंदर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. कलम 420,465,467,417,120 (ब), 34 गुन्हा दिनांक 20 मार्च 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्यातील जमीन मालक व फिर्यादी यांचे काका प्रविण हरगोविंदास शहा यांचे दि. 10 एप्रिल 1998 मध्ये सेलम, तामीळनाडु येथे निधन झालेले होते. प्रवीण यांच्या मालकीची मौजे भाईंदर नविन सर्वे नंबर 343/2 ही 1618.87 स्क्वेअर मी. इतकी जमिन आहे. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे व्यवसाय व नोकरी निमीत्त बाहेरगावी राहत असल्याने त्यांना जमिनीकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. या संधीचा फायदा घेत पेशइमाम मोहंमद अब्दुल रऊफ याने तोतया प्रविण हर गोविंददास शहा नावाचा इसम तयार करुन, त्याचे नावचे आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून, जमिनीचे ते एकटेच वारस असल्याचे सांगून इतर आरोपींशी संगणमत करुन कोट्यावधीची जमीन केवळ पाच लाख 50 हजार रुपयाला बनावट रजिस्टरदस्त बनवुन विक्री केली होती.
तोतया प्रविण हरगोविददास शहा यांचे खरे नाव व पत्ता याची काही ही माहिती नसताना मागील 7 महिन्यापासून मिरारोड, मुंबई, अमरेली-गुजरात येथे शोध घेवुन, नमुद आरोपींची बारकाईने माहिती काढून, तांत्रिक तपास करून आरोपी चंद्रकांत प्रभुदास घेलाणी, (रा. अहमदाबाद शहर, राज्य गुजरात ) असे निष्पन्न करुन, पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली होती.24 ऑगस्ट च्या दरम्यान अटक केली असून, त्यास मा. न्यायालयात हजर केले असता नमुद आरोपीताची दिनांक 28 ऑगस्ट पोलीस कोठडी मंजूर आहे. गुन्हयाचा पुढिल तपास भाईंदर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे करीत आहे. अशा रितीने तोतया आरोपीताची कोणतीही माहिती नसतांना त्याची माहिती मिळवुन त्यास गुन्हयात अटक केली आहे.
अटक आरोपींची नावे
1.तोतया प्रविण हर गोविंददास शहा
(रा.अमरेली, गुजरात,)
2.पेशहमाम मोहंमद अब्दुल रऊफ (रा. कुर्ला पश्चिम, मुंबई.)
3.देवेंद्र मणिलाल धासवाला, (रा. एम.जी. रोड, जैन मंदिराचे जवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई )
4.सुरेश जादवनकुम, (रा.मालाड मुंबई) आरोपी आहे.
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालय, दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त,मिरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालय, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ , 01, दिपाली खच्चा, सहायक पोलीस आयुक्त याचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले, सहाय्यक फौजदार राजेश पानसरे, पोलीस हवालदार रविंद्र भालेराव, पोलीस अंमलदार गजानन चव्हाण, राहुल काटकर यांनी केली आहे.