Bhayandar Crime News : भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना केले अटक
भाईंदर :- मुंबई,नवी मुंबई, मुंबई उपनगर, मीरा भाईंदर यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले असले तरी तेथे बेकायदेशीरित्या वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. भाईंदर मध्ये बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या 09 बांग्लादेशीय नागरिकांना Bangladeshi People तसेच त्यांच्या त्यांना राहण्यासाठी सहारा देणाऱ्यांना पोलिसांनी Bhayandar Police Arrested Illegal Bangladeshi Migrants अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.मुंबई सह इतरत्र पोलिसांनी आतापर्यंत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेश हे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली आहे. Bhayandar Crime News
पोलिसांकडून नागरिकांच्या घरांवर छापा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष -भाईंदर यांच्या बातमीदाराकडून नया नगर मिरा रोड सेक्टर नं-04 न्यू मीरा पॅराडाईज बिल्डिंगच्या पाठीमागील झोपडपट्टी गीता नगर, अस्मिता बिल्डिंगच्या समोरील बिल्डिंगमध्ये या ठिकाणी विनापरवानगी बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सकाळी 09.05 ते 11.45 दरम्यान छापा टाकून 09 बांग्लादेशी महिलेला अटक केली आहे. तसेच राहण्यासाठी भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या आणि एका महिलेला हि अटक करण्यात आली आहे. तसेच यातील पाहिजे असल्या आरोपींच्या विरोधात महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3,4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 7,13,14-अ(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून शहरात अशा पद्धतीने बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशीय नागरिकांना पोलीस शोधत आहे. तसेच पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या व्यक्तींना घरे भाडेतत्त्वावर देऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. Bhayandar Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे,शितल जाधव, पोलीस हवालदार सम्राट गावडे व महिला अश्विनी वाघमारे सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी हे कायदेशीर त्या वास्तविक करणाऱ्या महिला नागरिकांना अटक केली आहे. Bhayandar Crime News
Web Title : Bhayandar Crime News: Bangladeshi nationals on the loose in Mumbai
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…