क्राईम न्यूजमुंबई

Bhayandar Crime News : मुंबईत बांग्लादेशी नागरिकांचा सुळसुळाट

Bhayandar Crime News : भाईंदरच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाच्या पोलिसांची कारवाई ; बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना केले अटक

भाईंदर :- मुंबई,नवी मुंबई, मुंबई उपनगर, मीरा भाईंदर यांसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले असले तरी तेथे बेकायदेशीरित्या वास्तव्य करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. भाईंदर मध्ये बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या 09 बांग्लादेशीय नागरिकांना Bangladeshi People तसेच त्यांच्या त्यांना राहण्यासाठी सहारा देणाऱ्यांना पोलिसांनी Bhayandar Police Arrested Illegal Bangladeshi Migrants अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.मुंबई सह इतरत्र पोलिसांनी आतापर्यंत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेश हे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली आहे. Bhayandar Crime News

पोलिसांकडून नागरिकांच्या घरांवर छापा

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष -भाईंदर यांच्या बातमीदाराकडून नया नगर मिरा रोड सेक्टर नं-04 न्यू मीरा पॅराडाईज बिल्डिंगच्या पाठीमागील झोपडपट्टी गीता नगर, अस्मिता बिल्डिंगच्या समोरील बिल्डिंगमध्ये या ठिकाणी विनापरवानगी बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सकाळी 09.05 ते 11.45 दरम्यान छापा टाकून 09 बांग्लादेशी महिलेला अटक केली आहे. तसेच राहण्यासाठी भाडेतत्त्वावर घर देणाऱ्या आणि एका महिलेला हि अटक करण्यात आली आहे. तसेच यातील पाहिजे असल्या आरोपींच्या विरोधात महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नया नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात पासपोर्ट अधिनियम 1920 चे‌ कलम 3,4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे‌ कलम 7,13,14-अ(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून शहरात अशा पद्धतीने बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशीय नागरिकांना पोलीस शोधत आहे. तसेच पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर रित्या राहणाऱ्या व्यक्तींना घरे भाडेतत्त्वावर देऊ नये अन्यथा कारवाई करण्यात येईल. Bhayandar Crime News

Avinash-Ambure

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत महिला पोलीस शिपाई अश्विनी भिलारे,शितल जाधव, पोलीस हवालदार सम्राट गावडे व महिला अश्विनी वाघमारे सर्व नेमणुक-अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी हे कायदेशीर त्या वास्तविक करणाऱ्या महिला नागरिकांना अटक केली आहे. Bhayandar Crime News

Web Title : Bhayandar Crime News: Bangladeshi nationals on the loose in Mumbai

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0