Bhayandar Crime News : 06 वर्षांपासून फरार आरोपी अटकेत
• Bhayandar Crime News चोरी, घरफोडी यांसारख्या गुन्हयामध्ये सराईत गुन्हेगार, सहा वर्षांपासून फरार असलेला आरोपीला भाईंदर पोलिसांनी जेरबंद केले
भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील फरार आणि सराईत आरोपींवर अटक करून कारवाई करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले होते. भाईंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जास्तीत-जास्त मुख्य आरोपी यांना अटक करून कारवाई करण्याकरिता गुन्हे प्रकटीकरण कक्षाने खास बातमीदार तयार करून फरार, मुख्य आरोपी यांचा शोध घेत आहे. भाईंदर पोलिसांना एक सराईत, घरफोडी, चोरी करणाऱ्या तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपीबाबत माहिती मिळाली होती. आरोपीच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात 29 मार्च 2018 मध्ये भा.द.वि. कलम 457, 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता. आरोपी हा भाईंदर आणि मुंबईत कधीतरी ये-जा करत असतो अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच,आरोपी हा गुन्हा झाल्यापासून म्हणजे जवळपास सहा वर्षांपासून फरार असला असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. Bhayandar Crime News
आरोपीला भाईंदर मधून अटक, सहा वर्षापासून आरोपी ठाव-ठिकाण बदलत असल्याचे तपासात निष्पन्न,2023 मध्येही चोरीचा गुन्हा दाखल
पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी हा मुंबई परिसरात कधीतरी येत-जात असल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी भाईंदरच्या शास्त्रीनगर येथून आरोपी इब्राहिम दस्तगीर चौधरी याला 22 जुलै 2024 रोजी खात्रीलायक बातमी आणि गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. भाईंदर पोलीस गुन्हे प्रकटीकरण कक्षाला सहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यास यश आले आहे. तसेच, आरोपीच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी येणे फिर्यादी याच्या घरामध्ये खिडकीची ग्रील वाकून त्याच्या घरातील 65 हजार किंमतीचे दोन मोबाईल,इतर वस्तू आणि रोख रक्कम अशी चोरी केल्याच्या गुन्हा आरोपीवर दाखल आहे. तसेच,आरोपीवर भाईंदर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379,34 प्रमाणे 2023 मध्ये ही गुन्हा दाखल आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले हे करत आहे. Bhayandar Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर वसई विरार, पोलीस आयुक्तालय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-01, दिपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, विवेक सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईंदर पोलीस ठाणे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले, पोलीस हवालदार रविंद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, के.पी. पवार, के.आर. पवार, सुशिल पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, पोलीस शिपाई संजय चव्हाण, सलमान पटवे, राहुल काटकर यांनी केलेली आहे. Bhayandar Crime News